सूर्या चे लग्न

 सूर्या चे लग्न



एक गाव होते .त्या गावांमध्ये एक पाण्याचे तळे होते. 
त्या तळ्यामध्ये खूप सारे बेडूक राहायचे .  एक दिवस बेडकांना माहिती मिळाली की यंदा सूर्याचे लग्न ठरले आहे त्यांना ही माहिती कळल्यावर त्यांना खूप आनंद झाला ते नाचू लागले खूप खुश होऊ लागले. 
पण त्या बेडकां पैकी एक वयस्कर म्हातारा बेडूक मात्र त्यांना पाहत होता तो बेडूक खुश तर नव्हताच पण चिंतेत होता . 
सर्व बेडकांचे लक्ष त्या बेडका कडे गेले आणि ते त्याला विचारायला आले की का बर आपण चिंतेत आहे ? 

ते पण इतकी आनंदाची बातमी कळल्यावर सुद्धा मग तो वयस्कर बेडुक सांगू लागला,"अरे मूर्खांनो विचार करा आत्ताच उन्हाळ्यात उन्हामुळे आपले तळे पूर्ण आटून जाते जर उद्या चालून सूर्याला दोन-तीन मुलेबाळे झाली तर आपले हाल काय होतील .
तात्पर्य - आधी विचार करा मग कृती करा .



English Translation - 

Surya che lgnnn  ( सूर्या चे लग्न )



 Once upon a time, there was a village. In that village, there is a small lake . That lake has lots of frogs.  One day they got the news that the sun's marriage has been fixed this year. All of them has very happy to hear this news .

 They started dancing and became very happy . But one of the old frogs was watching them that frog was not happy but worried . 

all the frog turned their attention to that frog and they came to ask him, why he was worried even after receiving such happy news. 

                      Then the old frog began to speak," Think about it you fools, right now in summer, the sun dries up our lake completely. if in the future the sun has two or three children then what will happen to us? "

Moral of the story: think  before you act

Comments